डफळापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, चव्हाण कस्ट्रक्शनचे चेअरमन बाळासाहेब चव्हाण, राजू माळी,सागर चव्हाण, प्रसाद सावळे,रविकिरण भोसले,श्री.वगरे,दुगाणे,पप्पू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.