डोर्लीत किरकोळ कारणावरून हाणामारी

जत,संकेत टाइम्स : डोर्ली ता.जत येथे पाईप फोडल्याच्या‌ कारणावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे जत पोलीसात दाखल झाले आहेत.ताई शिवाजी भूसनूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश विलास भूसनूर,रेखा रमेश भूसनूर,विलास आण्णाप्पा भूसनूर,वैशाली दिनेश भुसनूर सर्वजण रा.डोर्ली यांच्या विरोधात लाथा बुक्याने मारहाण करत तोंडाने चावा घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


विलास आण्णाप्पा भूसनूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आप्पा आण्णाप्पा भूसनूर,शिवाजी आप्पा भूसनूर,ताई शिवाजी भूसनूर रा.डोर्ली यांच्या विरोधात शिवीगाळ करत‌ लाथाबुक्यानी मारहाण करून तोंडाने चावून जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.