संखमध्ये‌ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना कारवाईचा दणका

जत,संकेत टाइम्स : संख,ता.जत येथे
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गाव बंद ठेवण्यात आले आहेत.
तरीही बेपर्वार्ह नागरिक रस्त्यावर फिरत आहेत.अशा नागरिकांना उमदी पोलीसांनी कारवाईचा दणका दिला. 
उमदी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनखाली
संख नाकाबंदी करण्यात आली.दरम्यान विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना 500 रूपये दंड करण्यात आला.जत तालुक्यात पॉझिटिव्ह असून रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ धडक होत आहे. त्या पार्श्वभूमिवर पोलीसाकडून कारवाई कडक करण्यात आली आहे.