तरूणीवर हल्ला,नंतर घेतल विष ; तरूण तरूणी,तरूणीची‌ आई गंभीर

मुंबई : विरारमध्ये एका तरुणाने प्रेम प्रकरणातून तरुणीसह तिच्या कुटुंबावर हल्ला केल्याची घटना नवी असतानाच वसईमध्ये इसी थक्क करणारी घटना घडली आहे.तरुणाने एका तरुणीवर चाकूने हल्ला करून तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 
याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
वसई एव्हरशाईन येथे एका तरुणीवर 29 वर्षीय तरुणीवर तिच्याच मित्राने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी घरी असताना तरुणाने अचानक प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई जखमी झाली आहे. 
हल्लेखोर तरुण हा या तरुणीचा मित्र असून, तिने त्याच्याबरोबर मैत्रीचे संबंध तोडले होते.या गोष्टीचा राग मनात धरून त्याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं.जमखी तरूणी,तरणावर रुग्णालयात उचार सुरू‌ आहेत.