संखमध्ये दारू दुकान बनले कोरोनाचे संसर्ग केंद्र | नियम ढाब्यावर बसवून कांऊटरवरून दारू विक्री ; उत्पादन शुल्‍क विभागाचे‌ दुर्लक्ष का?

जत,संकेत टाइम्स : संख ता.जत येथील दारू दुकानातून शासनाचे नियमाची पायमल्ली करून काऊंटरवरून जादा दराने विक्री सुरू असल्याची चर्चा आहे.
शासनाने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील देशी दारू दुकाने उघड्याची परवानगी दिली आहे.मात्र संबधित ग्राहकांची कोरोना निगेटिव्ह अहवाल बघून घरापर्यत‌ डिलेव्हरी द्यावायची असे कडक आदेश देण्यात आले आहेत.मात्र संख मधिल देशी दारू दुकानातून कोरोना अहवाल,डिलेव्हरी नियम ढाब्यावर बसवून थेट दुकानातून दारूच्या बॉटल तेही जादा दराने विक्री होत असल्याची चर्चा आहे. यामुळे एकीकडे तालुक्यात वाढलेल्या कोरोनाचा प्रसार आणखीन वाढणार तर आहेत.त्याशिवाय कोरोना संसर्गाचे केंद्र हे दारू दुकान बननार हे निश्चि  आहे.शासनाचे निर्बंध पायदळी तुडविणाऱ्या या दुकानावर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होणार का? याकडे लक्ष लागले आहे.पुर्व भागातील दारू विक्री केंद्र

जत पुर्व भागातील गावागावात थाटलेल्या बेकायदा दारू अड्ड्यावर संख येथून दारू पुरविली जात आहे.रात्रभर सर्व नियम ढाब्यावर बसवून दारू विक्री करून कायदा सुव्यवस्था बिघवडत तर आहेतच,त्याशिवाय कोरोनाच्या भयानक स्थितीत संसर्ग वाढविण्याचे बॉम्ब पुरवत असल्याचे आरोप होत आहेत.सर्व धंदे बंद करून शासन प्रयत्नाची पारकष्ठा करत आहे.दुसरीकडे शासनाने नियम पाळण्याचे प्रतिज्ञा पत्र सादर केलेले दारू दुकानदार कोरोना संसर्ग केंद्रे बनली आहेत.लोकवस्तीत दुकानामुळे महिला,लहानग्यावर वाईट परिणाम

संख येथील देशी दारू दुकान भर लोकवस्तीत सुरू आहे. शासनाचे‌ नागरी वस्ती,शाळा,मंदिराजवळ मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश असतानाही संख येथील या दुकानाला भर लोकवस्तीत सुरू ठेवण्यात मुभा कोणी दिली हाही संशोधनाचा विषय ‌आहे.अशा लोकवस्तीत दुकाने सुरू असल्याने लगतच्या महिला,बालकाच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे.