संखमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या

जत,संकेत टाइम्स : संख ता.जत येथील शेतकरी सिध्दमला शिवराय जगगोंड यांनी गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडीस आली.याबाबत उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सिध्दमला यांचे संख पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोऱ्याळ वस्ती येथे दोन एकर जमीन आहे.


सिध्दमला हे शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडले होते.ते परत आले नाहीत,मंगळवारी त्यांच्या आई शेतात मोटार चालू करण्यासाठी गेल्या असता सिध्दमला यांचा मृत्तदेह झाडाला लटकलेला दिसला.त्यांनी शेजाऱ्यांना यांची माहिती दिली,काही लोकांनी यांनी घटना उमदी पोलीसांना कळविली.सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.उपस्थित पोलीसांनी मृत्तदेह खाली उतरवत पंचनामा करून मृत्तदेहाचे शव विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.


दरम्यान सिध्दमला यांची पत्नी व मुलगा हे ऊसतोडीसाठी बाहेरगावी राहतात.सिध्दमला संख येथे राहतात.शुक्रवारी सकाळी ते घराबाहेर पडले होते,ते परत आले नाही, मंगळवारी सायंकाळी सिध्दमला यांच्या आई मोटार चालू करण्यासाठी शेतात गेल्या असताना हा प्रकार उघडीस आला.सिध्दमला यांनी रविवारी आत्महत्या केल्याचा पोलीसाचा प्राथमिक अंदाज आहे.


आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.सिध्दमला यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे.अधिक तपास सुनिल गडदे करत आहेत.दरम्यान जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने घडत असल्याने चिंतन करण्याची वेळ आली आहे.कृषी विभाग,सामजिक संघटनानी याबाबत शिबिरे आयोजित करत शेतकऱ्यांच्या परिवर्तनाची उमेद निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.