कोरोना वाढत असतानाही,उपाययोजना का ? नाहीत | खा.संजयकाका पाटील यांना संजय कांबळे यांनी विचारला जाब

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तरीही तालुक्यातील यंत्रणा बेपर्वार्ह आहे.ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णाची हेळसाड केली जात असून शौच्छालयात‌ अस्वच्छता, पिण्यायोग्य पाणी मिळत नाही,अशा पध्दतीने सुरू असलेला रुग्णाच्या आरोग्याशी खेळ थांबवावा,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिला आहे.
जत येथे खा.संजयकाका पाटील,व आमदार विक्रमसिंह सांवत यांना इतकी परिस्थिती खालावली असतानाही तुम्ही काय करतायं,आम्ही तुम्हाला मतदान केले आहे. त्यामुळे आम्हाला सोयी उपलब्ध करून देण्याची तुमची जबाबदारी असल्याचे सांगत,तुम्ही यात सुधारणा केली नाही तर सामान्य जनतेला घेऊन रस्त्यावर उतरेन असा गंभीर इशारा खा.पाटील यांना कांबळेनी दिला.
रस्त्यावर नागरिक फिरत आहे,चौकाचौकात गर्दी होत आहे.
तरीही पोलीस कारवाई करत नाहीत,एकादा दुय्यम अधिकारी गाडीत बसूनच फक्त स्पिकरवरून मास्क घालण्याचे आवाहन करतो यापलिकडे पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत,पोलीसासमोर काही दुचाकीस्वार नियमाचे उल्लंघन करत बेधडक वावरत आहेत.तरीही कारवाई केली जात नाही,पोलीस,नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे जत शहरासह तालुक्यात रुग्ण वाढत आहेत.यावर‌ कोणाचे तरीही नियंत्रण पाहिजे,मात्र ते नसल्याने तेही बिनधास्त आहेत.शहरात उप जिल्हा रुग्णालयाचे काम अर्धवट पडले आहे.


ते तातडीने पुर्ण करावे,त्यामुळे रुग्णांना फायदा होऊ शकतो.कोरोना रुग्णांना वेळेत उपचार,ऑक्सीजन, रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत,अशी मागणीही कांबळे यांनी खा.पाटील यांच्याकडे केली.


जत येथील आढावा बैठकीत थेट खासदारांना जाब विचारताना संजय कांबळे