जत शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागात कोरोना सुसाट,अजूनही नागरिक गाफीलच

जत : सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 75 हजारांच्या घरात पोहोचला आहे. रोज हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण सापडत असून,15 ते 20 लोकांचा रोज मृत्यू होत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचा टक्काही घसरल्याने जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. अगोदरच शहरांमध्ये जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. असे असूनही नागरिक गाफीलच आहेत. मास्क, सोशल डिस्टन्स ठेवूून हात सॅनिटाझयर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य विभागासह प्रशासनही आता हतबल झाले आहे. उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरत आहेत.
ग्रामीण भागात बाधितांच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत असल्याचा दावा आरोग्य विभाग करीत असला, तरी प्रत्यक्षात ट्रेस झालेल्यांची कोरोना चाचणी होत नसल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले आहे.
होम क्वारंटाईन व होम आयसोलेट केलेल्या लोकांवर वॉच ठेवण्यासाठी प्रत्येक गावात समित्या नियुक्त केल्या होत्या. सुरुवातीचे काही दिवस या समित्यांनी योग्य जबाबदारी पार पाडली. सध्या या समित्या गायब असून, सर्वच लोक वाऱ्यावर आहेत.
प्रत्येक कोरोनाबाधिताच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. तसेच चाचण्याही केल्या जातात. बाधितांवर कर्मचारी, आशा वर्करमार्फत नजर ठेवली जात आहे.

- डॉ.संजय बंडगर 
तालुका आरोग्य अधिकारी