अवैध धंद्याला बळ देणाऱ्या जत पोलीसाविरोधात मोर्चा काढणार ; विलासराव जगताप

जत,संकेत टाइम्स : युवक,मजूर सामान्य नागरिकांना बरबाद करणारे अवैध धंदे तात्काळ बंद करा,अन्यथा रस्त्यावर उतरू,असा इशारा हप्तेबाज जत पोलीसाना माजी आमदार विलासराव जगताप इशारा यांनी दिला आहे.यात जिल्हा पोलीस प्रमुखांनी तातडीने लक्ष घालून हप्तेबाजीला सोकावलेले
निरीक्षक उत्तम जाधव यांची बदली करावी व  धंदे बंद करावेत अशी मागणीही जगताप यांनी केली आहे.
जगताप म्हणाले, आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिवेशनात तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे,त्यानंतरही तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध‌ धंदे सुरू आहेत.आमदार सांवत
यांचे पोलिसांसोबत साटेलोटे असल्याची शंका यामुळे उपस्थित होत आहे.गत‌ लॉकडाऊनमध्ये बंद झालेले जत ठाण्यातच्या हद्दीत मटका, जुगार, सावकारी, दारूविक्री,शिंदी, गुटखा विक्री आदी बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरु आहेत. एकीकडे पोलीस सामान्य जनतेला नियमाची भिती दाखवून छळ करत‌ आहेत.दुसरीकडे पोलीस ठाण्यात अनेक कारनामे करत कायदा‌ ढाब्यावर बसविला जात‌ आहे. दुसरीकडे अवैध धंदेवाले व गुंडांना बळ देण्याचे काम पोलीस ठाण्यातील झारीतील शुक्रचार्याकडून सुरू आहे.त्याला निरिक्षिक जाधव यांना थेट पाठिंबा आहे. यामुळे पोलिसांची वचक संपत चालली आहे.तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शेळके चांगलं काम करत होते.त्यांची बदली करून तालुक्याला बरबाद करून लुटणारे अधिकारी‌ इथे आणून बसवले आहेत.हा प्रकार तातडीने थांबवावा,अन्यथा पोलीस ठाण्याच्या विरोधात मोर्चा काढू असा इशारा जगताप यांनी दिला आहे.