पाईपलाईन जोडली,ढिगारा तसाच | जत नगरपरिषदचे अजब कारभार,जीव गेल्यावर सुधारणार काय?

जत,संकेत टाइम्स: जत शहराची जबाबदारी असणाऱ्या नगरपरिषदेचा भोगळ कारभार‌ शहराच्या प्रतिमेला डागळत आहे.शहरातील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना नियंत्रणात ठेवणारी यंत्रणाच जत नगरपरिषदेत नाहीत.पदाधिकाऱ्यांवर कर्मचारी शिरजोर झाले आहेत.कोणतेही काम सुरळीत केले जात नसल्याने समस्या सोडविताना दुसरी समस्या उभी केली जात आहे.यांचा प्रत्यय पुन्हा जत करांना आला.
जत शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या सांगली रोडवरील भारती वस्तीगृहा नजिक पाणी पुरवठा पाईपलाईनची पाईप गेल्या आठवड्या पासून लिकेज‌ होती.थोडक्यात होणारे काम वाढविण्याची सवय लागलेल्या नगरपरिषदेच्या यंत्रणेकडून खड्डा काढून पाईप पुर्ण फुटेपर्यत वाट बघितली.पाईप फुटल्यानंतर दुरूस्ती करण्यात आली.


मात्र पाईपलाईन ठिकाणी खोदण्यात आलेली माती व्यवस्थित खड्ड्यात टाकून मुजविण्याचे साधे‌ कामही संबधित कर्मचाऱ्यांनी केले नाही.परिणामी मुख्य वळण रस्त्यावर मातीचा जीवघेणा ढिगारा तसाच रस्त्यावर ठेवण्यात आला आहे.विशेष म्हणजे‌ शहरात अशाच पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना यांचे वाईट वाटत‌ नाही,किंबहुना हे काम व्यवस्थित करा,असे‌ सांगण्याचे धाडसही कोण दाखवत‌ नाही.परिणामी एकाद्याचा‌ नाहक जीव गेल्यानंतर नगरपरिषद अधिकारी, प्रशासन जागे होणार काय ?असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

जत शहरातील मुख्य रस्त्यावर असा मातीचा ढिगारा ठेवण्यात आला आहे.