जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे लाॅकओपन | वसूली जोमात ; अधिकारीही गुंतले,वसूली कलेक्टर सुपरफास्ट

जत,संकेत टाइम्स : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संचारबंदी आदेश लागू झाला.यामध्ये जत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय व बाजारपेठ ठरलेल्या टायमिंगला बंद असतात. मात्र पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य सुरू असलेले धंदे मात्र सायंकाळ पासून पहाटेपर्यंत खुलेआम राजरोस पणे सुरू असतात. त्यामुळे आता वैद्य धंद्यांना लाॅकडॉऊन तर अवैध धंद्यांना लाॅकओपन का? असा सवाल जनतेमधून होत आहे. तेरी भी चूप मेरी भी चुप अशी अवस्था पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांची झालेली आहे.जत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गावात अवैद्य धंदे गुटका ,दारु ,मटका , जुगार यांनी थैमान घातलेले आहे तर शिंगणहळळी, कोसारी, मुचंडी, पाच्छापूर,कुडणूर या गावांमध्ये वाळू माफियांनी उच्छाद मांडलेला आहे.अगदी राजरोसपणे कोणाच्या आशीर्वादाने अवैद्य धंदे उघडउघड सुरू आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
ठाकरे सरकारने राज्यात कडक संचार बंदीचा आदेश काढला आहे. त्यामध्ये अनेक व्यवसायांना पार्सल सुविधा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा हॉस्पिटल मेडिकल वगळता इतर कुठल्याही व्यवसायाला परवानगी दिली नाही. असे असताना जत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये अवैद्य धंदेवाल्यांना व वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. त्यांना कोणी परवानगी दिली आहे.
     


पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक व अर्थपूर्ण तडजोडी मुळे दुर्लक्ष होते की काय अशा चर्चेला उधाण आलेले आहे. जिथे असे अवैध व्यवसाय चालू आहे तेथील वाळू माफिया अवैध धंदे चालवण्यावर पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने कडक कारवाई करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांच्या मधून मागणी होत आहे.
जत पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांच्यासह सोबतीला चार- चार सहाय्यक पोलिस निरीक्षक असा पदभार असताना सुद्धा अवैद्य धंदे वाले व वाळूमाफिया यांच्या मध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी विशेष लक्ष घालून सांगली जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक गेडाम यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.जत पोलीस स्टेशनला चांगला अधिकारी द्यावा किंवा सांगलीचे भरारी पथक पाठवुन अवैध व्यवसाय यांच्या मुसक्या आवळायला हव्या अशी नागरिकांच्या मधून मागणी होत आहे.सराईत वाळू तस्कर यांना पोलीस स्टेशन कडून क्लीनचिट दिली जाते 
कारवाई साठी नवखा वाहन मालकावर कारवाई करून मुसक्या आवळल्याचे भासवले जाते. हद्दीमध्ये अनेक ठिकाणी क्लब चालू आहेत. लॉजवर नियमांची पायमल्ली होते. जत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा तर वेश्येच्या गळ्यात मोहनमाळ असा प्रकार होऊन बसलेला आहे.पालकमंत्री व पोलिस अधीक्षक यांनी अवैद्य गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.