आक्कळवाडीच्या एकाचा आंध्रप्रदेशमध्ये अपघातात मुत्यू

बालगांव,संकेत टाइम्स : आक्कळवाडी (ता.जत) येथील मल्लिकार्जुन शेजाळे हे श्रीशैलला गेले होते.जाऊन परत येताना मंगळवारी मोटारसायकल वरून परतत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.अधिक माहिती अशी की, मल्लिकार्जुन शेजाळे हे श्रीशैल येथे देवदर्शनासाठी गेले होते.देवदर्शन आटपून ते व भीमराव पाटील दुचाकीवरून आक्कळवाडी कडे परतत असताना आंध्रप्रदेश राज्यातील हंचीन कट्टी येथेे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.


त्यात मल्लिकार्जुन शेजाळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवर मुत्यू झाला तर भीमराव पाटील हे जखमी झाले आहेत.या घटनेने आक्कळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.