पिएसआय सुनिल पाटील यांचा सत्कार

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यातील टोणेवाडी येथील पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल सुनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पंतगे यांच्या हस्ते पाटील यांचा शाल,पुष्पगुच्छ श्रीफळ,व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
गेल्या दहा वर्षापासून सुनिल पाटील पोलिस दलात कार्यरत आहेत.त्यांनी त्या काळातील अनुभवाची माहिती दिली.


दिनकर पंतगे म्हणाले, जत साऱख्या ग्रामीण भागात सुनिल पाटील सारखे युवक आदर्श ठरणारे आहेत.त्यांच्या कार्य सलाम आहे.ग्रामीण भागातील युवकांनी युपीएससी,एमपीएससी परिक्षा कड़े वळावे.संजय सांवत म्हणाले,ग्रामीण भागातून आलेले तरूण चांगले होतकरू अधिकारी बनले आहेत.ते आपल्या मायमातीसह जेथे‌ काम करतील तेथे न्याय देतील,न्यायाच्या बाजूला उभे राहतील.


या कार्यक्रमाचे आयोजन रतिलाल नुलके परिवाराकडून करण्यात आले होते. संरपच,उपसंरपच,सदस्य, उपस्थित होते. सुत्रसंचालन पुकार आवटी यांनी केले.एम.जगदीश यांनी आभार मानले.नजीर चट्टरगी,भिमराव अडसुडे,आदी मान्यवर उपस्थित होते.


टोणेवाडी येथे पिएसआय सुनिल पाटील यांचा सत्कार करताना दिनकर पंतगे