मिरवाड तलावातील अनओळखी मृत्तदेहाचे अद्याप गुढ कायम

डफळापूर, संकेत टाइम्स : मिरवाड ता.जत ‌येथे सापडलेल्या अनओळखी इसमाच्या मृत्तदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.पोलीसाकडून कर्नाटक सीमावर्ती गावात कोन हरविला आहे काय यांचा शोध घेतला जात आहे.
मिरवाड येथील तलावात पुरूष जातीचा‌ 40-45 वर्ष वयाचा अनओळखी रवीवारी मृत्तदेह आढळून आला होता.जत पोलीसांनी परिसरात याबाबत माहिती घेतली आहे.मात्र जत कवटेमहांकाळ,मिरज तालुक्यात असा कोणताही इसम हरविल्याची नोंद नाही.त्यामुळे आता लगतच्या कर्नाटक भागातून माहिती मिळविली जात आहे. दरम्यान शवविच्छेदनात इसमाचा बुडून मृत्यु झालाचा अहवाल पोलीसांना मिळाल्याचे समझते.