जत‌ तालुक्याला दुसऱ्यादिवशी अवकाळीचा तडाका

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात मंगळवारी अवकाळी पावसाने दुसऱ्या‌ दिवशी तडाखा दिला.दुपारी दोनच्या सुमारास वारे,विजेच्या कडकडाटासह आलेल्या बिगरमोसमी पावसाने तालुकाभर गारवा निर्माण ‌झाला आहे.तर वादळी वाऱ्यांने गावात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 


बसर्गी येथे पावसात विज पडून झाडाखाली बांधलेल्या दोन म्हैसीचा दुर्देवी मुत्यू झाला.वादळी वाऱ्यामुळे बिळूर,उमराणी,मुंचडी,दरिबडची,संख,डफळापूर, बाज,कुंभारी, परिसरात विज वाहिन्या तुटल्याने अनेक गावचा विज पुरवठा विस्कळीत झाला आहे.


बसर्गी येथील कलाप्पा सिद्राया तांवशी यांच्या घरासमोरील झाडाखाली बांधलेल्या म्हैसीच्या अंगावर विज पडल्याने दोन म्हैसीचा मुत्यू झाला.दोन्ही म्हैसीचे मिळून सुमारे 1 लाख‌ रूपयाचे  नुकसान झाले आहे.तालुक्यात बंहुताश गावात पावसाने‌ हजेरी लावली.