उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अँबुलन्स कंट्रोल रूम

0



सांगली : कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरीता खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या अँबुलन्स नागरीकांना माफक दरात व वेळेवर मिळाव्यात याकरीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे सोमवार दि. 12 एप्रिल 2021 पासून अँबुलन्स कंट्रोल रूम ची स्थापना करण्यात येत आहे,अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.





कंट्रोल रूम कडून नागरिकांना पुढीलप्रमाणे मदत, सुविधा व माहिती पुरवण्यात येतील. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 24 तास 7 दिवसा करीता अँबुलन्स कंट्रोल रूची स्थापना करण्यात येत असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 0233-2310555 आहे. या क्रमांकावर ज्या नागरिकांना खाजगी अँबुलन्सची आवश्यकता आहे, त्यांना संपर्क साधून अँबुलन्सचे बुकिंग करता येईल. 


Rate Card





अँबुलन्स बुकिंग केल्यानंतर संबंधित नागरिकांना अँबुलन्स क्रमांक, चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक पुरवला जाईल. जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलचे डॉक्टर्स यानांही कंट्रोल रूम मार्फत अँबुलन्स बुकिंग करता येईल. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी दि. 7 जुलै 2020 रोजीच्या बैठकीत खालीलप्रमाणे मंजुर केलेल्या भाडेदराप्रमाणे भाडे अदा करता येईल. अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे तक्रार दाखल करता येईल. तक्रारीत रूग्णाचे नाव, अँबुलन्सचा क्रमांक, कोठून कोठे असे प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे, असे आवाहन श्री. कांबळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.