वाळेखिंडीतील दारू अड्डा नागरिकांनी बंद केला

वाळेखिंडी : वाळेखिंडी ता.जत येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धंदे कडकडीत बंद करण्यात आले असतानाही,स्टँड नजिकच्या चौकात बेकायदा दारू,गुटखा विक्री सुरू संतप्त नागरिकांनी बंद केली.
वाळेखिंडी येथील स्टँड चौकात काही विक्रेत्याकडून बेकायदा दारू विक्री सुरू आहे. जत पोलीसाच्या हप्तेखारीमुळे हा अड्डा जोमात सुरू आहे.गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा उद्रेक रोकण्यासाठी गावातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.मात्र स्टँडवरील अवैध व्यवसाय बेधडक सुरू होता.अनेक मद्यपीचा वावर तेथे सुरू होता.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता होती.


त्यांची माहिती गावातील पदाधिकाऱ्यांनी जत पोलीसांनी दिली होती.मात्र पोलीसाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.परिणामी संतप्त नागरिकांनी एकत्र येत हा बेकायदा अड्डा बंद केला.दरम्यान नागरिकांनाच अशा पध्दतीने काम करावे लागत असतील तर पोलीसांचे काय काम असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला.