जतमधील शितल शिंदे यांचे सेट परिक्षेत यश

जत,संकेत टाइम्स : जत येथील प्रा.डाॅ.शितल राजाराम शिंदे यांचे सेट परिक्षेत उज्वल असे यश मिळविले.जत येथिल प्रा.डाॅ.शितल राजाराम शिंदे (एम.एस्सी.पी.एच.डी.) यांना सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे तर्फे आयोजित 27 डिसेंबर 2020 महाराष्ट्र-गोवा सेट परिक्षेत रसायनशास्त्र या विषयात चांगले यश मिळाले.डाॅ.शितल शिंदे यांनी शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथून सन 2012 मध्ये ऑरगाॅनिक सिन्धेसिस मधून संशोधन पूर्ण केले.


शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथिल रसायनशास्त्र विभागाच्या प्रोफेसर डाॅ.राजश्री साळुंखे  यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. 
डाॅ.शितल शिंदे या मुळच्या शेगाव ता.जत येथिल असून सध्या त्या विज्ञान महाविद्यालय सांगोला काॅलेज येथे कार्यरत आहेत.यापूर्वी ही त्यानी दुधी भोपळ्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्याने त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले होते.डाॅ.शितल यांचे वडिल शेगाव येथिल प्रगतशिल शेतकरी असून डाॅ. शितल यांना शेतीत नवनविन उपक्रम राबविण्याचे छंद आहे.जत येथील राजेरामराव महाविद्यालय येथिल संशोधक डाॅ.संजय लठ्ठे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.डाॅ.शितल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.