आदेश धुडकावत बाजारात गर्दी कायम

डफळापूर,संकेेेत टाइम्स : जत तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शासनाने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व कठोर निर्बंध आखले आहेत. शनिवार व रविवार या दोन दिवसात सर्व बंद ठेवण्याचे आदेश आहेत. असे असताना ही पुन्हा सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जत शहरासह,उमदी,संख,बिळूर,डफळापूर,माडग्याळ यासह अनेक गावात मोठी गर्दी ठिकठिकाणी होऊ लागली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेमुळे नागरिकांच्या जनजीवनात बाधा येऊ नये. त्यांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये. यासाठी अत्यावश्यक सेवेला परवानगी दिली आहे. याच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरातील नागरिक भाजीपाला खरेदी, किराणा दुकान, फळ विक्रेते व इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाची भयावह स्थिती असतानाही अजूनही मास्क व सामाजिक अंतराचा अभाव ठिकठिकाणी जाणवत आहे. एवढेच नव्हे तर लसीकरणाच्या ठिकाणी ही शहरवासीयांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेतला तरच ही कोरोनाची साथ आटोक्यात येईल अन्यथा शहरवासीयांना या पेक्षाही गंभीर स्थितीचा सामना करावा लागणार आहे.