खासदारांनी घेतला जतेतील कोरोना परिस्थितीचा आढावा | हालगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा यंत्रणांना दिला इशारा

जत,संकेत टाइम्स  : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता
खा.संजयकाका पाटील यांनी जत येथे आढावा बैठक घेतली.यावेळी आ.विक्रमसिंह सांवत,प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,जि.प.सदस्य सरदार पाटील, अँड.प्रभाकर जाधव उपस्थित होते.जत‌ तालुक्यात दैनंदिन कोरोना रूग्णवाढीचा आकडा दीडशेवर गेल्याने चिंतेचं वातावरण आहे.वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
तालुक्यातील रुग्ण संख्या,ऑक्सीजन, व्हेंटिलेटर,आरोग्य कर्मचारी,याची खा.पाटील यांनी माहिती घेतली.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट असलेल्या आणि प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या भागात प्रभावीपणे उपाययोजना आणि अंमलबजावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व आयएलआय/एसएआरआय रुग्णांचे सर्वेक्षण तसंच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या फ्यू सदृश्य रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करणे बंधनकारक करण्याचं यावेळी सांगण्यात आलं.दरम्यान जत शहरातील नगरपरिषदेचा‌ कारभारासह सध्या‌ ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाबत ‌उदाशीनता पाह्याला मिळत आहे.नगरपरिषदेला अधिकारी नसल्याने त्याचा कारभार लगडा झाला आहे.त्यामुळे नागरिकांचे कोरोना काळात हाल सुरू आहे.यावर तोडगा काढण्याची मागणी विक्रम ढोणे यांनी खा.पाटील यांच्याकडे केली.

प्रभाकर जाधव यांनी कोरोना रुग्णांना साधी रुग्णवाहिका मिळत नाही.उपचाराची स्थिती याहून वाईट आहे.प्रशासन गंभीर झाल्याचे दिसत नसल्याने खा.पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.संजय कांबळे यांना ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष अनुभवच‌ खा.पाटील यांच्या समोर मांडला.सामान्य रुग्णाची अवस्था भयंकर वाईट झाली असून ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णाबाबतचा निष्काळजी पणाची माहिती देत,आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे. तुम्ही आमचे प्रश्न सोडविण्यास बाध्य आहात,अशी भूमिका घेत,यात सुधारणा न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा खा.पाटील व आ.सावंत यांना दिला.  खा.पाटील म्हणाले,कोरोना काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे,हालगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.जत येथील आढावा बैठकीत बोलताना खा.संजयकाका पाटील,बाजूस आ.विक्रमसिंह सांवत