भिवर्गी ग्रामपंचायतकडून कोविड लसीबाबत जनजागृती

भिवर्गी,संकेत टाइम्स‌: भिवर्गी(ता.जत)येथील सरपंच मदगोंड सुसलाद व उपसरपंच बसवराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्स ठेवून गावात लसीकरण बाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व 45 वर्षावरील लोकांनी लवकरात लवकर कोविड लसीकरण करून घ्यावे. 


या लसीचे बाबतचे महत्व पटवून देत हे लस आपल्या कुटुंबाला अती महत्वाची व सुरक्षित आहे,असे मार्गदर्शन केले.
आमदार विक्रमसिंह सावंत, प्रांतअधिकारी,गटविकास अधिकारी तलाठी, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व पोलिस पाटील यांना कोरोना लसीबाबत‌ जागृत्ती करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार मंगळवारपासून भिवर्गी ग्रामपंचायतीने लसीकरण मोहीम हाती घेतली.यावेळी पोलिस पाटील श्रीशैल चौगुले,अंगणवाडी सेविका शोभा हिरेमठ,बाळासाहेब सुसलाद, प्रकाश चौगुले, हणमंत पाटील, मल्लिकार्जुन मैलापुरे, महासिद्ध जडिवेडर, कुमार वाघोली,आदी उपस्थित होते.भिवर्गी ग्रामपंचायतकडून कोविड लसीबाबत जनजागृती करण्यात आली.