जतेत एकाच दिवशी तिघाचे मुत्यू | पाण्यात बुडून महिलेचा,दोघांनी गळपासाने संपविली जिवनयात्रा

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात एका महिलेसह दोघाचा मुत्यूच्या घटनेने सोमवार घातवार ठरला.तालुक्यातील उमराणी येथील एक 
महिलेचा तलावात पाय घसरून मुत्यू झाला तर जत व शेगाव येथील तरूणांनी गळपास लावून जीवनयात्रा संपविल्याच्या दुर्देवी घटना तालुक्यात घडल्या आहेत.


यमनव्वा सिद्राम कांबळे (वय 80,रा.उमराणी),अमोल कुमार जमदाडे (वय 23,रा.खाटीक गल्ली जत),शंकर ऊर्फ अमित अरुण शिंदे (वय 32,रा.तिप्पेहळ्ळी)अशी मयत तिघांची नावे आहेत.तिन्ही घटनाचे गुन्हे जत पोलीसात दाखल झाले आहेत.
पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,
जत शहरातील खाटिक गल्ली येथे राहणारे अमोल कुमार जमदाडे यांनी आपल्या राहत्या घरी वरच्या मजल्यावरील खोलीत स्लँपच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याचे आई वडील गावी गेल्याने घरी कोणीच नव्हते.भाऊ खोलीत गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना आली. मयत अमोल हा अविवाहित असून आत्महत्येचे नेमके कारण समजून आले नाही.अधीक तपास पोलीस नाईक वहिदा मुजावर ह्या करत आहेत.दुसरी घटना तिप्पेहळी येथे घडली, शंकर ऊर्फ अमित अरुण शिंदे यांनी शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळपास लावून आत्महत्या केली. मयत हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी लहान दोन मुले आहेत.प्रताप राजाराम शिंदे यांनी जत पोलिस ठाण्यात वर्दी दिली असून पूर्व तपास पोलीस हवालदार सदाशिव कणसे हे करीत आहेत.घटना सायकांळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेतही आत्महत्येचा नेमके कारण समजू शकले नाही.तिसरी दुर्दैवी घटना उमराणी येथील असून यमनव्वा सिद्राम कांबळे (वय 80) ही वयोवृद्ध महिला कपडे धुण्यासाठी तलावात गेली असताना, तिचे पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडून त्याचा दुर्देवा मृत्यू झाला. 


गुरुनाथ वाघमारे यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.महिल्या एकट्याच राहत होत्या.तिन्ही मृतदेहावर जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.तिन्ही घटनेतील नातेवाईक,मित्र मंडळीनी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली होती.एकीकडे कोरोनाचा तालुक्यात विस्फोट झाला असताना या दुर्देवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.