कोंतेबोबलाद कडकडीत बंद

कोंतेबोबलाद,संकेत टाइम्स : कोंतेबोबलाद ता.जत येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गाव कडकडीत बंद पाळण्यात आले आहे.
जत तालुक्यातील ‌शेवटचे‌ टोक असलेल्या कोंतेबोबलाद परिसरातही कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.त्याशिवाय लगत असणाऱ्या विजापूर शहराचा संपर्क मोठ्या प्रमाणात आहे.त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रभाव गावात वाढू नये यासाठी ग्रामपंचायती कडून दक्षता घेण्यात आली आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यापासून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत.शनिवार, रविवार पुर्ण कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे रस्ते,चौक निर्मनुष्य झाले आहेत.


कोंतेबोबलाद ता.जत येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.