विकेंड लॉकडाऊन,पहिल्याच दिवशी जतेत सामसूम | गावे,रस्ते निर्मनुष्य

जत,संकेत टाइम्स : राज्य सरकारने लागू केलेल्या पहिल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सारे जत शहर चिडीचूप झाले. रस्ते निर्मुनष्य होते. चौकाचौकात पोलीस फिरत होते. नेहमी गजबजलेला 
स्टँड परिसर,स्टेट बँक,मंगळवार पेठ,शासकीय कार्यालय परिसर,विजापूर-गुहागर महामार्ग आपपल्या कुुटंबात विसावला होता. ग्रामीण भागातही लोकांनी व्यवहार बंद ठेवून घरीच राहणे पसंद केले. 
डफळापूर,संख,माडग्याळ, उमदी,शेगाव,बिळूर आदी गावातही लोकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिला.
प्रत्यक्षात या लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीच झाली असली तरी  जतकरांचा शनिवारची सकाळ आळसावलेली होती. उठून काय करायचे आहे म्हणून बराच वेळ लोक अंथरुणातच पडून राहिले. शनिवारी सकाळी मात्र लागू झालेला लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत कायम होणार की काय या भितीनेच अनेकांची गाळण उडाली. 

संकेेेत टाइम्स प्रतिनिधीने सकाळी साऱ्या शहरभर फेरफटका मारला. रस्त्यावर अत्यंत तुरळक वर्दळ दिसत होती. ग्रामीण भागातून दूध घेवून आलेले गवळी घरोघरी दूधाचे वाटप करत होते. पालिकेचे आरोग्य कर्मचारी त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते.
ओला कचरा..सुका कचराची धून सगळीकडे वाजत होती. तुंबलेली गटर्स काढण्याचे कामही सुरु होते.
अपवाद वगळता रस्त्यावर चिटपाखरू नव्हते.महिलाची धुणे, घरातील स्वच्छतेची कामे सुरु होती. रस्त्यावर मुले क्रिकेट खेळत होती.औषधाची दुकाने सुरु होती परंतू फारसे ग्राहक नव्हते. रक्त तपासणी प्रयोगशाळा व तुरळक कुठेतरी दवाखाना सुरु होता. दूधविक्री केंद्रे मात्र सुरु होती. ज्या कुटुंबात दहावी-बारावीची मुले आहेत त्या पालकांची चिंता तर वेगळीच होती. या परिक्षा होणार की लांबणार याबध्दल कांहीच माहिती मिळत नाही. परिक्षा लांबणीवर जातील म्हणून मुलांनाही अभ्यासातून अंग काढून घेतल्याने पालक हवालदिल झाले आहेत.जत शहरातील मुख्य विजापूर-गुहागर महामार्ग निर्मनुष्य होता.मुख्य पेठेत सामसुम होती