विज पडून महिलेचा मुत्यू | जतला वादळी पावसाचा तडाखा ; पुर्व भागाला गाराने झोडपले

0



करजगी,जत : जत तालुक्याला विजाच्या कडकडासह आलेल्या वादळी पावसाने झोडपले.यात दुर्देवाने जत शहरालगत झाडाखाली उभारलेल्या एका महिलेचा विज पडून मुत्यू झाला.

तालुक्यात पंधरवड्यात दुसऱ्यावेळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले.जत शहरातील विठ्ठल नगर येथील तुळसाबाई यशवंत डोंबाळे(वय 50) या सायकांळी चारच्या सुमारास जूना कोळीगिरी रोडच्या सांवत मळ्या नजिक शेळ्या चारत होत्या.







अचानक पाऊस आल्याने त्या जवळ असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली उभ्या राहिल्या असताना अचानक वीज कोसळल्याने त्यांचा दुर्देवी मुत्यू झाला. दरम्यान जत शहरासह,पुर्व,पश्चिम भागातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपले.जत शहरासह पश्चिम भागातील डफळापूर, बेंळूखी,बाज,अंकले परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.







अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली होती.दरम्यान अक्राळ,विक्राळ विजेच्या कडकडामुळे भितीचे वातावरण होते.तालुक्यातील पुर्व भागासह,जत शहर व पश्चिम भागाला पावसाने झोडपले.रविवारी दुपारच्या दरम्यान पुर्व भागातील 

भिवर्गी,करजगी,बोरगी,बेळोंडगी, मोरबगी या परिसरात विजेचा कडकडाट,वादळी वारे,गाराच्या पावसाने हाहाकार उडविला.

Rate Card

पुर्व भागाला गाराचा तडाखा बसला.त्यामुळे हंगामाच्या अखेरीला असलेल्या द्राक्ष, डाळिंबाला मोठा फटका बसला.त्याशिवाय चांगले उत्पादन मिळू शकणाऱ्या आंबा बागांनाही तडाखा बसला आहे.







अनेक बागात आंब्याचे अंथरून झाले आहे.काही शेतकऱ्यांच्या ज्वारीचा कडबा भिजला आहे.

कोरोनाचे थैमान सुरू असतानाच तालुक्याला अवकाळी पावसाचे दणके बसत आहेत.त्यामुळे कोरोनामुळे अडचणीत असलेले शेतकरी आणखीन अडचणीत आले आहेत.






करजगी ता.जत येथे गाराचा पाऊस झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.