संखमध्ये दोनशे बेडचे कोविड सेंटर सुरू करा सर्वतोपरी सहकार्य करू ; तुकाराम बाबा

जत,संकेत टाइम्स : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत जत पूर्व भागात संख,माडग्याळ, गुड्डापूर या ठिकाणी सर्व सोयीयुक्त 200 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करावे,त्यास सर्वतोपरी सहकार्य करू,अशी ग्वाही चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती,श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा यांनी दिली आहे.
चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा यांनी मंगळवारी प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांची भेट घेत त्यांना सहकार्य करण्यासंदर्भात निवेदन दिले.यावेळी मानवमित्र प्रशांत कांबळे ,सोहन धुमाळ,विवेक टेंगले आदीजन उपस्थित होते
जत तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोनाच्या या लढ्यात श्री.संत बागडेबाबा मानव मित्र संघटना प्रशासनाला सहकार्य करणार आहे. जिथे प्रशासनाला अडचण आहे तिथे श्री.संत बागडेबाबा मानव मित्र संघटना सहकार्याला सज्ज आहे. प्रशासनाने हाक द्यावी,आम्ही साथ देवू अशी ग्वाही दिली. 
तुकाराम बाबा म्हणाले की, संख येथे 200 बेडचे सुसज्ज रुग्णालयासाठी लागणारी चार ते पाच हजार चौरस फूट इमारत व त्या सोबत लाईट व जनरेटर,सॅनिटायझर व मास्क इत्यादी सर्व बाबींचा आम्ही आपल्या प्रशासनास मदत करण्यास तयार आहोत.सेंटर चालू केल्यानंतर जे काही रुग्ण राहतील व त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईक यांची जेवणाची व शुद्ध पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था आम्ही आमच्या संघटनेतर्फे करून प्रशासनाला सहकार्य करू,या बाबीचा विचार करून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन  तुकाराम बाबा यांनी केले आहे.


जत : प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना निवेदन देताना तुकाराम बाबा