जत‌ नगरपरिषदेने कोविड सेंटर उभारावे

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असून तालुक्यात कोरोनावर उपचार मिळणे दुरपास्त झाले आहे.
सर्वाधिक जत शहराची चिंता वाढली असून शहरात‌ कोरोनाचा विस्फोट झाला आहे.पुढील काही दिवसही उपचारासाठी मोठे संकट उभे राहणार आहे.त्यामुळे जत नगरपरिषदेने इतर तालुक्याप्रमाणे जत शहरात कोविड सेंटर उभे करावे अशी मागणी होत आहे.जत शहरात दररोज 15 ते 20 कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत.त्याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे शासकीय,खाजगी हॉस्पिटलही फुल्ल होत आहेत.त्यामुळे वेळेत उपचार,ऑक्सीजन न मिळाल्याने रुग्णाचा मुत्यू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जत नगरपरिषदेने जत शहरातील एकाद्या शाळेत किंवा सार्वजनिक जागेत तातडीने कोविड रुग्णालय उभारावे,अशी मागणी आहे.पुण्यकाम करण्याची संधी !

जत शहराला खड्ड्यात घालून स्व:चाची पोळी भाजून घेणाऱ्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी मोठ्या शहराची रया घालवली आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.किमान आता बिघडलेल्या स्थितीत कोविड रुग्णालय उभे करून पुण्यकाम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या हितासाठी नगरपरिषदेने पाऊल उचलावावे,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.