जत ‌तालुक्यात वादळी पावसाचा फटका | पुर्व भागात‌ बेदाण्याचे नुकसान ; विज कोसळून गाईचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातीलत काही भागात जाेरदार तर काही भागात हलक्या स्वरूपात वादळी पावसाने हजेरी लावलीे.रवीवार (दि.11) सायंकाळी काेसळलेल्या या अवकळी पावसामुळे द्राक्षे,डाळिंब व आंब्याचे तसेच भाजीपाल्याच्या विविध पिकांसह मोठ्या प्रमाणात बेदाण्याचे नुकसान झाले. वादळामुळे काही गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला हाेता.शिवाय विजांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.तालुक्यातील अंकले,आंसगी,सह अनेक गावात विज कोसळून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.आंसगीतुर्क येथील शेतकरी रामू शिवराया लोणे यांच्या झाडाखाली बांधलेल्या गाईच्या अंगावर विज कोसळल्याने गाईचा मुत्यू झाला.तर अंकले येथील दादासाहेब चंदनशिवे यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर विज कोसळल्याने झाडाने पेट घेतला,येथे दुसरे काहीही नुकसान झालेले नाही.जत शहरासह तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी पावसाच्या जाेरदार सरी बरसायला सुरुवात झाली,
तब्बल तासभर हलक्या सरी कोसळल्या. वादळामुळे शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला हाेता. 


तालुक्यातीलजत,शेगाव,बिळूर,डफळापूर संंख,आंसगी,जत परिसरात साेसाट्याचा वारा आणि मेघगर्जनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. त्यामुळे  सुरक्षितस्थळी साहित्य ठेवण्यासाठी धावपळ सुरू झाली हाेती. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण असले तरी या भागात पावसाच्या सरी बरसल्या नाहीत. मात्र, जाेरदार पाऊस काेसळण्याची शक्यता बळावली हाेती.
दरम्यान, शहर व तालुक्यातील काही भागात सायंकाळी 5.30 वाजल्या पासून वादळाला तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली हाेती. या पावसामुळे तालुक्यात पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. तालुक्यातील जत,शेगाव,कुंभारी,
डफळापूर,बाज,बेंळूखी,संख,आंसगी आदी भागात वादळी पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने द्राक्ष,बेदाणा,डांंळिब व आंब्याचे माेठे नुकसान झाले.