पैशाचा पाऊस पाडण्याच्या भूलथाफा देत,युवतीवर अत्याचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक

वर्धा : वर्ध्या जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका तरुणीला पैसे मिळवूून देण्याचे अमिष दाखवत,तब्बल 80 कोटी रुपयाच्या नोटांचा पाऊस पडतो. अशा भूलथापा मारत लैंगिक अत्याचार करणाऱ्या मांत्रिकाला भंडारा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. जादू करून पैसेे मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत मांत्रिकाने युवतीला विवस्त्र करीत वारंवार लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगणघाट येथील येरणगाव मधील 21 वर्षीय युवतीच्या डोक्यावरून वडिलांचे निधन झाले आहे.नातलग आणि आई तिचा सांभाळ करायचे. उच्च शिक्षण घेण्यासाठी पीडितेने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वर्ध्यात केले. पीडितेच्या आई व काकाच्या संपर्कात बालू मंगरूळकर हा व्यक्ती आला. त्याने मांत्रिक देखील जोडला. आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होवू या आमिषाला पीडितेची आई आणि काका बळी पडले.मांत्रिकांच्या आमिषाला भूलत विश्वास ठेवल्याने हा प्रकार घडला आहे.