आंवढीत‌ तातडीने पाणी सोडण्याच्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आदेश

आंवढी,संकेत टाइम्स : आंवढी,लोहगाव,सिंगनहळ्ळी गावांना पाणी सोडण्यात येणाऱ्या बंधिस्त पाईपलाईनला असणारी गळती तातडीने काढून आवंढी,अंतराळ , मोकाशेवाडी,शिंदेवाडी,बागलवाडी,सिंगणहळी,लोहगाव,बोरगेवाडी, माणेवाडी या गावांना पाणी सोडावे,असे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पांटबधारे विभागाच्या‌ अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री पाटील हे गुरूवारी जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते,त्यानी येळवी,सनमडी येथील बंधिस्त पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली.यावेळी सरपंच परिषेदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग,उपसरपंच आण्णासाहेब बाबर,युवा नेते सुभाष कोडग व ग्रामस्थांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली.


सध्या आंवढी परिसरातील गावात पाणीटंचाई जाणवत आहे.
या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बधिंस्त पाईपलाईनचे काम पुर्ण आहे.काही किरकोळ ठिकाणी असणारी गळती काढून अंतराळ,वायफळ येथील मुख्य कँनॉलमधून पाणी सोडण्याची मागणी केली. मंत्री पाटील यांनी गळती काढून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.दरम्यान मंत्री पाटील यांनी तात्काळ हा प्रश्न निकाली काढल्याने आंवढीसह परिसरातील गावात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऐन टंचाईत पाणी येणार असल्याने बागायत‌ शेतीसह,पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे‌ नेते माजी सभापती सुरेश शिंदे,तालुकाध्यक्ष रमेश पाटील,कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, कार्यकारी अभियंता कुमार पाटील साहेब,सहाय्यक अभियंता 
अभिमन्यू मासाळ,चोपडे,मिरजकर, मनोज कर्नाळे, बाबा पाटील उपस्थित होते.


येळवी,सनमडी दौऱ्यावर आलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आंवढी परिसरातील पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.