राष्ट्रवादी कॉग्रेसच्या रक्तदान शिबीरास प्रतिसाद

जत,संकेत टाइम्स : राज्यात व देशात निर्माण झालेली कोरोनाची महाभयंकर परिस्थिती, आणि त्यामध्ये अपुरा पडणारा रक्तपुरवठा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे‌ अध्यक्ष शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यातील बचत भवन येथे जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.यात‌ 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रांरभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या फोटोचे पुजन तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते झाले व रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन अमोल डफळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी जेष्ठ नेते सुरेशराव शिंदे,कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण,माजी सभापती शिवाजी शिंदे, वक्ता प्रशिक्षण विभाग जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले, जिल्हा सदस्य रुपेश पिसाळ, नगरसेवक तथा तालुका युवक अध्यक्ष स्वप्निल शिंदे,नगरसेवक प्रविण जाधव, ग्राहक संरक्षण तालुकाध्यक्ष विपुल शिंदे, वक्ता प्रशिक्षण तालुकाध्यक्ष लक्ष्मण कदरे, महिला कार्यकर्ते सौ.शारदा शिंदे, डॉ.पराग पवार, सिद्धू शिरशाड, विकास लेंगरे, इम्रान गवंडी, संतोष देवकर, शफीक इनामदार, प्रतापराव शिंदे, अजयकुमार शिंदे,उमरफारूक बारुदवाले व इतर कार्यकर्ते,प्रतिसाद मिळाला. 

जत‌ येथे‌‌ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न झाला.