येळवीत चार कुपनलिका खोदून नागरिकांची सोय

येळवी : येळवी ता.जत येथे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती कडून स्मशानभूमी सह तीन वस्त्यावरील नागरिकांसाठी चार ठिकाणी कुपनलिका खोदल्या.चारही कुपनलिकांना चांगले पाणी लागले आहे.येळवीत भविष्यातील पाणी टंचाई ग्रहीत धरून पिराजी सातपुते वस्ती,शिंदे वस्ती व सिद्धेश्वर शिंदे यांच्या घराजवळ कुपनलिका खोदण्यात आल्या.तसेच स्मशानभूमी येथे अंत्यविधी वेळी लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन स्मशान भूमीत अंत्यविधी वेळी लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन स्मशानभूमीत कुपनलिका खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली.ग्रा.प.सदस्य संतोष पाटील यांनी यांचे नियोजन केले.लवकरचं‌ या कुपनलिकेतून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.


येळवी येथे पाणी पुरवठ्यासाठी कुपनलिका खोदण्यात आल्या.