कोरोनाला हद्दपार करण्यासाठी संकल्पाची गुढी उभारूया ; आ.विक्रमसिंह सांवत |आरोग्य‌ विभाग,प्रशासनाला सहकार्य करा

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे.संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे काम प्रशासन करत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला नागरिक,व्यापारी,व्यवसायिकांनी सहकार्य‌ करावे,असे आवाहन आ.विक्रमसिंह सांवत यांनी केले.

तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आ.सांवत यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली.





यावेळी आरोग्य,पंचायत समिती,महसूल,ग्रामपंचायती,रुग्णालये, आरोग्य केंद्रे,कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला.यावेळी प्रांताधिकारी प्रंशात आवटे,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, डॉ.विवेक पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर,सर्व केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.






आ.सांवत पुढे म्हणाले,कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा आपणाला सामना करावा लागत आहे.पहिल्या लाटेला आपण मोठ्या धाडसाने हरविले होते.तसेच आताही करावे लागणार आहे.तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकारी, पोलीस,महसूल विभाग झोकून देऊन काम करत आहे. 






तालुक्यातील नागरिकांचे जास्तीत जास्त कोरोना लसीकरण करून घ्यावे.लसीकरणाची गती वाढवावी.नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन लस टोचून घ्यावी. कोरोनाच्या रोगापासून बचाव करण्यासाठी ज्या काही आरोग्य विषयक संरक्षणासाठी संचारबंदी, लॉकडाउन सारखे निर्बंध घातले आहेत.

Rate Card





त्याची कडक अंमलबजावणी करायला हवी. वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम बंद करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लावले आहेत.याचे कोणी उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात यावी.

दरम्यान जत तालुक्यात जत नगरपरिषद,ग्रामपंचायत स्तरावर हलगर्जी पणा होत असल्याचे पार्श्वभूमीवर आ.सांवत यांनी अधिकाऱ्यांना सतर्क होण्याच्या सुचना दिल्या.गतवेळी ग्रामपंचायतीकडून चांगले सहकार्य मिळाले होते.





ग्रामस्थांना संचारबंदी,लॉकडाऊनचे महत्व पटवून द्या,आताची लाट मोठा धोका घेऊन आली आहे.यापुढे शासनाकडून कडक लॉकडाऊन होण्याचीही शक्यता आहे.आपण तालुक्यात चांगले काम करण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकांना उपचार मिळावेत अशी सोय करावी,भविष्यात रुग्ण वाढू लागल्यास त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याची सुचना आ.सांवत यांनी दिली.




जत येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.विक्रमसिंह सांवत यांनी आरोग्य,महसूल,पोलीस प्रशासनाची बैठक घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.