जत तालुक्यातील कोरोनाची वाढत्या संख्येमुळे गावे, रस्ते निर्मनुष्य

जत,संकेत टाइम्स : जत
शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.शुक्रवार पर्यंत तालुक्यात एकूण बाधितांची संख्या 3 हजार 398 वर पोहोचली होती. त्यापैकी 2 हजार 570 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या ॲक्टिव्ह रुग्ण 745 असून, होमआयसोलेशनमध्ये 606 तर कोविड केअर सेंटरमध्ये 139 जण उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची प्रभावीपणे जत शहरासह ग्रामीण भागात अंमलबजावणी करण्यात येत आहे. रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे, तसेच दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.