जाडरबोबलादमधील दोघांना बेकायदा जिल्हा बँकेकडून कर्ज मंजूरी ; तम्मणगौंडा रवीपाटील यांचा आरोप | आमदारांनी अधिकाऱ्यांवर दबाब टाकला

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील जाडरबोबलाद मधील दोघा शेतकऱ्यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर विद्यमान आमदार व जिल्हा बँकेचे संचालक विक्रमसिंह सावंत यांनी बँक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून नियमबाह्य सोन्याळ सोसायटीतून कर्ज मंजूर करण्याचा प्रकार घडला आहे.अशा प्रकाराने जिल्हा बँक ही संचालकां
च्या मालकीची आहे काय? या सर्व प्रकाराची चौकशी करावी,अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवीपाटील यांनी केली आहे.
रवीपाटील म्हणाले,जाडरबोबलाद सर्व सोसायटीचे सभासद असणाऱ्या दोघा शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज प्रकरण रद्द केले असतानाही आमदार तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर नियमबाह्य सोन्याळ सोसायटीतून नियमबाह्य पध्दतीने कर्ज मंजूर केले आहे.एका सोसायटीकडून कर्ज नामंजूर केले जाते.पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँक कर्ज पुरवठा करतेच कसे,जाडरबोबलाद मधील दोघांना वेगळा नियम का? जिल्हा बँक राजकीय पक्षाची आहे काय? जिल्हा बँकेचे अधिकारी अशा दबावातून कर्ज मंजूरी देत असतीलतर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना तोच नियम लावून कर्ज पुरवठा करावा.
तम्मणगौंडा रवीपाटील म्हणाले,जाडरबोबलाद सोसायटीचे त्या दोन शेतकऱ्याचे कर्ज जिल्हा बँकेचे रद्द करते,आमदार सांवत अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात.त्यांना कॉग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे सांगतात.हे शोभनीय नाही,बँकेचे अधिकारी जर संचालकांचे ऐकून नियमबाह्य कर्ज मंजूर करत असतीलतर त्या विरोधात आम्ही दाद मागू असा इशाराही रवीपाटील यांनी दिला आहे.


 
अधिकाऱ्यावर दबाव ; जगताप

माजी आमदार विलासराव जगताप यांनी थेट जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क करत या कर्ज मंजूरीचा जाब विचारला,अधिकाऱ्यांनी आमदार सांवत यांनी दबाव टाकल्याने आम्ही कर्ज मंजूर केल्याचे सांगितले.यांची चौकशी करू असेही अधिकाऱ्यांनी जगताप यांना सांगितले.तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना वेगळा न्याय व जाडरबोबलाद येथील दोघांना कॉग्रेस पक्षात प्रवेश केला म्हणून नियमबाह्य कर्ज मंजूरी कशी दिली जाते,यांची चौकशी करावी,अशी मागणी जगताप यांनी केली.