लोकांनी नियम धाब्यावर बसवल्याने पुन्हा लॉकडाऊन भोगण्याची वेळ

जत,संकेत टाइम्स : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध आजपासून लागू केले जाणार आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी अधिक कडक केली जाईल. नागरिकांनी सात दिवस निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.