बेवनूरमध्ये पहिल्याच दिवशी 81 जणांना लस टोचली

आंवढी,संकेत टाइम्स : बेवनूर(ता.जत)मध्ये कोविड लसीकरणास सुरूवात करण्यात
आली. जत पंचायत समितीचे माजी
सभापती शिवाजी शिंदे, सरपंच सौ सुमनताई वाघमोडे,डॉ.सुधीर नाईक, रासपचे माजी जिल्हा अध्यक्ष मारुती सरगर, विजय कुमार नाईक,पोलिस पाटील महादेव शिंदे,दादासाहेब वाघमोडे ग्रामसेवक खोत, विष्णु सरगर,आरोग्य कर्मचारी उपस्थित
होते.पहिल्याच दिवशी लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला 81 व्यक्तींनी लस
टोचून घेतली.हे लसीकरण रोज 11 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.लस पूर्णत: सुरक्षित आहे. कोणताही दुष्परिणाम होत नाही.45 वर्षांवरील नागरिकांनी लस टोचून घ्यावी.गावात नोंदणीनुसार लस उपलब्ध करून देण्यात येईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी सांगितले. नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर नाईक यांनी यावेळी केले.
बेवनूर येथे कोरोना लसीकरणास सुरूवात करण्यात आली.