जतेत पुन्हा दोघाचे मुत्यू | 75 वर्षीय वयोवृद्धाची आत्महत्या,पोहताना तरूणाचा बुडून मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात पुन्हा एक तरूण व जेष्ठ नागरिकांचा मुत्यू झाला.कडीमळा येथील संतोष महादेव वाघमोडे (वय 19) यांचा विहिरीत बुडून तर आनंद गाऊंड उमराणी रोड येथील साहेबराव पंढरीनाथ बाबर (वय 75)यांनी गळपास लावून आत्महत्या केली.दोन्ही घटनाची जत पोलीसात नोंद झाली आहे.
अधिक माहिती अशी, कडीमळा येथील संतोष वाघमोडे व काही तरूण पोहण्यासाठी विहिरीत गेले होते.त्यादरम्यान संतोष वाघमोडे यांनी वरून उडी मारल्याने तो मोटारीची दोरी,पाईप व केबलमध्ये आडकला.त्यातून त्याला बाहेर येता आले नाही,सोबतच्या तरूणांनीही प्रयत्न केला मात्र त्याला बाहेर काढता आले नाही,दुर्देवाने त्याचा मुत्यू झाला.


घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली.डॉ.इरकर यांनी फिर्याद दिली आहे.महादेव वाघमोडे यांना संतोष एकुलता एक मुलगा होता.त्यांचाही असा दुर्देवी मुत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.दुसऱ्या घटनेत उमराणी रोडवरील आनंद गाऊड येथे राहणारे 75 वर्षीय साहेबराव पंढरीनाथ बाबर यांनी राहत्या घरी तुळीला गळपास लावून आत्महत्या केली. ही घटना सायकांळी साडेपाचच्या दरम्यान घडली.श्रीकांत शिवराम शिंदे यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.दरम्यान विहिरीत बुडून मुत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. पालकांनी मुलांना पोहायला पाठविताना खबरदारी घेण्याची यानिमित्ताने गरज निर्माण झाली आहे.
दुसरीकडे आत्महत्या करण्यापर्यत नागरिक पोहचतात कसे,याबाबतही जागृत्ती करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांना असे प्रकार रोकण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत.