गेल्या दोन दिवसात जत तालुक्याला दिलासा,तब्बल 59 रुग्ण कोरोनामुक्त | वाचा आजचे नवे रुग्ण..

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शनिवारी, रविवारी नवीन रुग्णापेक्षा कोरोना मुक्त होणारी संख्या वाढली.गेल्या दोन दिवसात तब्बल 59 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.


तालुक्यात 18 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर तब्बल 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यात गत आठवड्यात कोरोनाचे रुग्ण वाढत वाढत वाढले होते.मात्र शनिवारी रविवारी तालुक्याला दिलासा मिळाला असून शनिवारी 35,रवीवारी 24 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.


रविवारी करण्यात रुग्णालये,विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या तपासण्यामध्ये 18 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.जत‌ 6,बिळूर 2,वळसंग 2,शेगाव 1,कासलिंगवाडी 1,पाच्छापूर 1,खोजानवाडी 1,कोळेगिरी 1,सुसलाद 1,रेवनाळ 1,संख 1 येथे‌ नवे रुग्ण आढळून आले आहेत.सध्या तालुक्यात 250 रुग्ण उपचाराखाली आहेत.