जत तालुक्याला दिलासा | रुग्ण संख्या निम्याने घटली ; 52 नवे रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याला बुधवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात कोरोनाची संख्या निम्याने कमी झाली असून 52 नवे रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी तालुक्यातील 19 गावात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तब्बल 46 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
रुग्ण संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.बुधवारचे नवे रुग्ण असे,जत शहर 13,पाच्छापूर 3,शेगाव 4,वाळेखिंडी 2,संख 1,शेड्याळ 1,डफळापूर 2,दरिबडची 1,उमदी 3,कुणीकोणूर 1,जा.बोबलाद 1,येळवी 1,देवनाळ 1,बाज़ 1,खोजानवाडी 2,सुसलाद 2,मेढेगिरी 1,बिळूर 4,मुंचडी 1,वायफळ 1,इतर जिल्हे : सोलापूर 2,कर्नाटक 1,मंगळवेढा 3 असे एकूण 52 रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या 576 रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैंकी 450 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.