सांगली जिल्ह्यात 487 नवे,241 रूग्ण कोरोनातून मुक्त

सांगली : सांगली जिल्ह्यात रविवारी 487 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर 241 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर 5 जणाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील रुग्ण संख्या अजूनही नियंत्रणात आहे.रुग्ण बरे होण्याची संख्याही सातत्याने वाढत असल्याने दिलासादायक चित्र आहे.
रविवारी घेण्यात आलेल्या 3125 चाचण्यामध्ये 487 नवे रुग्ण आढळून आले आहेत.



सांगली महापालिका 163,आटपाडी 9,कडेगाव 43,खानापूर 66,पलूस 14,तासगांव 39,जत 15,कवटेमहांकाळ 9,मिरज 61,शिराळा 14,वाळवा 54 येथे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यात एकीकडे नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असताना 241 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.