जत तालुक्यात 48 नवे रुग्ण ‌| ग्रामीण भागाला कोरोनाचा विळखा | 18 गावात आढळले रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत शहरात पुन्हा कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी जत शहरात तब्बल 20 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याशिवाय ग्रामीण भाग आता कोरोनाच्या विळख्यात आला असून 18 गावात 28 रूग्ण आढळून आले आहेत.
गत लाटेत जत तालुक्यातील काही गावे वगळता ग्रामीण भाग कोरोनाचा प्रभाव जाणवला नव्हता.मात्र दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची बेफीकीर पणामुळे कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.
तालुक्यातील काही बोटावर मोजण्या ऐवढ्या ग्रामपंचायती कडून सतर्कता बाळगली जात असून शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन केले जात आहे. मात्र तालुक्यात अन्य गावात काळजी घेतली जात नसल्याने कोरोनाचा उद्रेक अटळ बनला आहे.
जत तालुक्यात शुक्रवारी करण्यात आलेल्या तपासणीत जत शहर‌ 20,आंवढी 1,बाज 1,बिळूर 3,संख 1,उमदी 6,माडग्याळ 1,येळवी 2,बालगाव 1,डफळापूर 1,तिकोंडी 1,आंसगी तुर्क 2,बनाळी 2,तिप्पेहळ्ळी 1,कोणीकोणूर 1,दरिबडची 1,पांडोझरी 1,कागनरी 1,करजगी 1 असे 48 रुग्ण आढळून आले आहेत.


तालुक्यातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. तालुक्यात शुक्रवारी 20 जण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या तालुक्यातील 368 रुग्ण उपचारा खाली आहेत.
त्यापैंकी 291 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.

ऑनलाईऩ जाहीरात करा,अगदी कमी खर्चात ; 9423830288