जतेत कोरोनाचा उद्रेक सुरूच | सोमवारी तब्बल 47 नवे रुग्ण | जत शहराची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक 47 इतकी रुग्ण संख्या आढळून आली.यात जत शहरातील 23 रुग्णाचा समावेश आहे.


तालुक्यातील चिंतेत भरणारी आजचे नवे रुग्ण  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे 27 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे.


तालुक्यातील गावनिहाय‌ रुग्ण संख्या जत शहर 23,सुसलाद 1,मोरबगी 1,कागनरी 3,संख‌ 1,शेगाव 5,काराजनगी 4,बागलवाडी 1,वाळेखिंडी 1,कोसारी 1,खैराव 1,बनाळी 1,वायफळ 1,तिप्पेहळ्ळी 1,वळसंग 1,पाच्छापूर 1 येथे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
सोमवार पर्यंत 270 रुग्ण उपचाराखाली आहेत.तालुक्यात रुग्ण बरे होणारी संख्या 86 टक्के आहे.जत शहराची चिंता वाढली आहे, सोमवारी 23 रुग्ण आढळून आले आहेत. बिनधास्त वावरणाऱ्या लोंकाना हा एकप्रकारे इशारा असून सावध न झाल्यास धोका अटळ असल्याचे चित्र आहे.