डफळापूर,अमृतवाडी हायरिस्कवर |तालुक्यात पुन्हा 44 नवे रुग्ण | ग्रामीण भागात प्रभाव वाढला

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शनिवारी 44 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.ग्रामीण भागातील चिंता पुन्हा वाढली आहे.ग्रामीण भागात शनिवारी तब्बल 36 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शनिवारी डफळापूर, अमृत्तवाडी येथे तब्बल 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे या दोन्ही गावाचा चिंता वाढली आहे.
जत शहर 8,आंवढी 1,बाज‌ 1,शेगाव 1,लोहगाव 2,डोर्ली 1,येळवी 1,रा.वाडी 1,डफळापूर 9, कोळगिरी 1,व्हसपेठ 1,अमृत्तवाडी 9,बनाळी 1,गुड्डापूर 1,करेवाडी को.बो.1,धुळकरवाडी 3,राजोबावाडी 1,जाल्याळ बु.1 असे एकूण 44 आढळून आले आहेत.
तालुक्यातील एकूण रुग्ण 2883 इतके झाले आहेत.तर 2411 कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात सध्या 390 उपचाराखाली आहेत.त्यातील 307 रूग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.तर 82 जणाचा दुर्देवी मुत्यू झाला.शनिवारी 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत.दरम्यान डफळापूर व अमृत्तवाडी गावची चिंता वाढली आहे.