माडग्याळमध्ये 40,गुड्डापूरमध्ये 100 बेडचे कोविड सेंटर सुरू होणार

जत,संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथे 40 रुग्णावर उपचार करता येतील असे कोविड रुग्णालय व गुड्डापूर येथील श्री.दानम्मादेवी भक्त निवासमध्ये कोविड सेंटर उभारण्यात‌ येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी दिली.
जत तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.पुढील काही ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातही रुग्ण वाढत असल्याने रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने धोका वाढत आहेत. त्यामुळे जत तालुक्यातील रुग्णांना तालुक्यातच‌ उपचार व्हावेत,यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु आहे.त्या पार्श्वभूमीवर माडग्याळ ग्रामीण रुग्णालय येथे जतच्या धर्तीवर सुमारे 40 रुग्णाचे कोविड रुग्णालय व गुड्डापूर येथे 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. 
सोमवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात गुड्डेवर यांनी माडग्याळ व गुड्डापूर येथे पाहणी केली आहे. लवकरचं दोन्ही ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचाराची सोय करण्यात येणार आहे.गतवेळी कोरोनाचा प्रभाव मर्यादित होता,मात्र दुसरी लाट तालुक्यात प्रभाव दाखवत असून सध्या एक हजारावर रुग्ण उपचाराखाली आहेत.दररोज शंभरावर रुग्ण वाढत असल्याने त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी दोन्ही ठिकाणी सोय करण्यात येणार आहे.व्हेटिंलेटर,ऑक्सीजन,तज्ञ डॉक्टर्स,नर्सेस,औषधे उपलब्ध करण्यात येणार आहेत.