सांगली जिल्ह्यात 380 नवे रूग्ण ; आणखीन 5 जणाचा मुत्यू

 

सांगली : सांगली जिल्ह्यात बुधवार ता. 7 रोजी 380 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर जिल्ह्यात पाच रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तर 215 जण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात कोरोना हळूहळु वाढत आहे.त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. 


बुधवारी‌  घेण्यात आलेल्या 2886 जणाच्या तपासणीत 380 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तालुकानिहाय आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे: आटपाडी 30, जत 43, कडेगाव 23, कवठेमंहकाळ 11, खानापूर 40, मिरज 32, पलूस 7, शिराळा 16, तासगाव 18,वाळवा 76, तर महापालिका क्षेत्रात सांगली शहर 56 मिरज शहर 28 असे सांगली जिल्ह्यात एकूण 380 रुग्ण आढळून आले आहेत. 


आज दिवसभरात 215 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सांगली महापालिका, जत,वाळवा,खानापूर तालुक्यात कोरोनाची नवे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत.