मंगळवारी जतेत 37 रुग्ण वाढले,मुत्यू झालेल्या संख्येतही वाढ | वाचा सविस्तर रुग्णसंख्या

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मंगळवारीही कायम राहिला.मंगळवारी पुन्हा 37 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर दोघाचा कोरोनामुळे दुर्देवी मुत्यू झाला आहे.जत शहराची चिंता कायम असून मंगळवारीही शहरात 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 21 जण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे.
तालुक्यातील कोरोनाचा दररोज बाधित रुग्ण आढळून येत असल्याने धोका कायम आहे.तालुक्यात मंगळवारी करण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तपासणीत जत 16,कुंभारी 3,माडग्याळ 4,पांडोझरी 2,पांढरेवाडी 2,खलाटी 1,बनाळी 1,दरिबडची 1,रावळगुंडेवाडी 1,तिप्पेहळ्ळी 1,खैराव 1,रेवनाळ 1,तिकोंडी 1,बागेवाडी 1,सांगोला 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या 2682 झाली असून 2318 कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात आतापर्यत 80 रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे. तालुक्यात 284 जण उपचाराखाली आहेत.तर सोमवारी तब्बल 21 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.


 त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या‌ रुग्णाची वाढती संख्याही दिलासा देणारी आहे.मास्क,सोशल डिस्टसिंग, सँनिटायझरचा  वापर सातत्याने करावा,असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.