सांगली जिल्ह्यात 32 रुग्णाचा मुत्यू | नवे 1175 रुग्ण

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे.शनिवारी जिल्ह्यात 1175 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 32 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील चिंता दिवसेन् दिवस वाढत आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने दररोज हजारावर रुग्ण सापडत आहेत.कडक लॉकडाऊन नंतरही रुग्ण संख्या कमी होत नसल्याने भिती व्यक्त केली जात आहे.शनीवारचे नवे रुग्ण ; जत 105,आटपाडी 116, कडेगाव 83,खानापूर 159,पलूस 51,तासगाव 104, सांगली म.न.पा 198,क.महाकांळ 54,मिरज 94 ,शिराळा 67,वाळवा 144 असे एकूण 1175 नवे रुग्ण आढळून आले आहेत.


तर जत 3,आटपाडी 2, कडेगाव 2,खानापूर 1,पलूस 3,तासगाव 4, सांगली म.न.पा 4,क.महाकांळ 3,मिरज 4 ,शिराळा 1,वाळवा 6 अशा 32 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.
जिल्ह्यात शनिवारी 642 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.