जत तालुक्यात मंगळवारी नवे 30 रुग्ण

 


जत,संकेत टाइम्स : जत शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शहरात मंगळवारी पुन्हा 19 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.रुग्ण संख्या वाढत असतानाही शहरातील नागरिक बेपर्वाई कायम आहे.निर्बंध लादूनही जतेत कारवाई झालेली नाही.परिणामी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.जत शहराबरोबर उमदी 2,माडग्याळ1,पांढरेवाडी 1,करजगी 4,बिळूर 2,वळसंग‌ 1 असे नवे 30 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या तालुक्यात 208 रुग्ण उपचारा खाली आहेत.