जत तालुक्यात सोमवारी 28 गावात नवे कोरोनाचे रुग्ण | जत शहर,बिळूर धोका रेषेवर

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शुक्रवारी 73 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.सध्या 745 रुग्ण उपचाराखाली आहेत.तालुक्याची चिंता कायम आहे.जत‌ शहर,बिळूर,येथे 15 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यात शुक्रवारी 28 गावात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


जत शहर 20,बिळूर 15,मेढिंगिरी 1,संख‌ 1,उमदी 1, वळसंग‌ 1,शेगाव 2,जा.बोबलाद 1,सनमडी 1,अंकलगी 2,येळवी 2,दरिकोणूर 1,बालगाव 1,कोणीकोणूर 1,पांढरेवाडी 1,जाल्याळ बु.1,तिकोंडी 2,देवनाळ 1,कोसारी 2,शेड्याळ 1,गुड्डापूर 1,सुसलाद 1,वज्रवाड 1,करेवाडी 1,गिरगाव 1,बागलवाडी 1,एंकूडी 1,लकडेवाडी 1,जाल्याळ खु.1,मंगळवेढा 5,कर्नाटक 1 असे एकूण 73 रूग्ण आढळून आले आहेत.तालुक्यातील रुग्ण संख्या यामुळे 3398 झाली असून 2570 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तालुक्यात सध्या 745 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैंकी 606 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.तालुक्यात कोरोनाचा विस्फोट कायम आहे. जत शहरासह अनेक गावे सध्या हॉस्टस्पॉटच्या स्थितीत आहेत.बिळूर मध्ये वाढलेली रुग्ण संख्या पुन्हा नवी भिती निर्माण करणारी आहे.